मुळात एन्डोस्कोपी म्हणजे उदरात (पोटावर) एक छद्रि करुन त्यातून दुर्बिण (एन्डोस्कोपी) आत टाकली जाते. कारबन डाय ऑक्साईड (CO2) या वायूने पोट फुगवलं जातं आणि एका प्रकाशस्त्रोताने आतलं निरीक्षण केलं जातं. त्याबरोबर जर काही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली तर नाभी व्यतिरिक्त २-३ छद्रि करुन त्यातून उपकरणं आत (पोटात) टाकून शस्त्रक्रिया केली जाते.
तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार तुमच्या वंध्यत्वाच्या काळजीचा भाग म्हणून या प्रक्रियेची शिफारस केली जाऊ शकते. लेप्रोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपीचा वापर निदान (केवळ पाहणे) आणि ऑपरेटिव्ह (शोधणे आणि उपचार करणे) या दोन्ही उद्देशांसाठी केली जाती.
एन्डोस्कोपीचा वापर स्रियांमध्ये मुख्यत: कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन्ससाठी आणि व्यंधत्व असलेल्या स्रियांमध्ये रोगाचे निदान करण्यासाठी होतो.सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'एन्डोस्कोपी' म्हणजे दुर्बिणीच्या मदतीने करण्यात आलेली वैद्यकीय तपासणी आणि निदान. :